Ad will apear here
Next
‘लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखन कार्यशाळा उपयुक्त’


पुणे : ‘लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणिवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त आहेत,’  असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि साहित्य सेतू यांनी आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ‘मसाप’चे कार्यवाह प्रमोद आडकर, साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पाटुकले आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले, ‘जागतिकीकरणांमुळे संपूर्ण जगात एकच भाषा, एकच जीवनपद्धती, एकाच प्रकारचे साहित्य आणि त्यातून संपूर्ण जग म्हणजे एकच बाजारपेठ निर्माण करणे असा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्थानिक निर्मिती क्षमता, प्रादेशिक परंपरा, साहित्य, लोककला लयाला जाणार आहेत. अशा वेळी नवीन लेखकांसाठी फार मोठे आव्हान आणि तितक्याच संधी निर्माण झाल्या आहेत.’

वेलणकर यांनी नवोदीत लेखकांनी तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाइन पुस्तक वितरण व्यवस्थांचा लाभ घेऊन व्यावसायिक लेखक बनण्याचा सल्ला दिला.

या कार्यशाळेमध्ये प्रा. पाटुकले यांनी छापील पुस्तक, ई-बुक, अ‍ॅमेझॉन किंडल बुक, ऑडिओ बुक निर्मिती प्रक्रिया, ऑनलाइन पुस्तक वितरण यावर, अ‍ॅड. कल्याणी पाठक यांनी एकाच पुस्तकाचे विविध प्रकारचे कॉपीराइट्स, त्यांचा आवाका आणि अधिकार यांविषयी आणि भालचंद्र कुलकर्णी यांनी आयएसबीएन, ऑनलाइन पोर्टल नोंदणी, नियतकालिकांची नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यातून नवोदित लेखक उपस्थित होते. प्रा. अनिकेत पाटील यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZPOBT
Similar Posts
‘युवा पिढीने नियमित व्यक्त होणे गरजेचे’ पुणे : ‘मराठी साहित्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समृद्ध, सजस व अजरामर करण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यासाठी युवा पिढीने नियमितपणे विविध सामाजिक-राजकीय विषयांवर परखडपणे व्यक्त होणे गरजेचे आहे,’ असे मत जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.
पुण्यात अनुवाद लेखन कार्यशाळेचे आयोजन पुणे : साहित्य सेतू व महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) यांच्या वतीने ‘अनुवाद कसा करावा?’ ही लेखन कार्यशाळा १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदाशिव पेठेतील एमईएस ऑप्टिमेट्री कॉलेज येथे ही कार्यशाळा होईल.
पुणे येथे ब्लॉगलेखन कार्यशाळा पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉगर बना’ ही लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. यात ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉगलेखन कसे करावे, त्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, ब्लॉग निर्मिती प्रक्रिया आणि कमर्शियल ब्लॉगिंग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.   ब्लॉगलेखन
‘जागतिक महिला दिन हा आत्मचिंतनाचा दिवस’ पुणे : ‘जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मीडियावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे,’ असे मत डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language